Ad Code

महाराष्ट्र वन विभाग भरती 2022 //Maha Forest Bharti 2022


Maha Forest Bharti :-

                नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल वन विभाग मध्ये वन रक्षक पदा साठी अर्ज मगविण्यात येणार आहे.तर मित्रानो आज आपण या लेखा मध्ये वन विभागाची माहिती बघणार आहोत.

तर मित्रानो भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील)नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाने दि. ४/५/२०२२ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्याआहेत. आता सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय दिनांक २१/११/२०२२ अन्वये भुतपूर्व दुय्यम सेवा निवडमंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब(अराजपत्रित), गट-क व गट ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याताना यापुढे स्पर्धा परिक्षा टि.सी.एस.-आयओएन ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेक) व आय.बी. पी. एस. (इंस्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेलसिलेक्शन) या कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार ऑनलाईनपध्दतीने स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी यापैकी कोणत्याही एका कंपनीची आवश्यकतेनुसार निवड करावयाची आहे.तसेच सदर शासन निर्णयान्वये परीक्षा शुल्क, कंपनीशी करावयाचा सामंजस्य करार याबाबतच्या सुधारीत तरतुदीदिलेल्या आहेत.

२.त्यानुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २१/११/२०२२ च्या शासन निर्णयातील कार्यपध्दती /तरतुदी यांची तपासणी करुन भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्याकक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट ड संवर्गातील पदे सरळसेवेनेभरण्याबाबत आवश्यक कार्यवाही करणेबाबत शासनाने संदर्भ ३ वरील पत्रान्वये सुचीत केले आहे.

३.उपरोक्त सुचनांचे अनुषंगाने कळविण्यात येते की, वनविभागातील सरळसेवेने भरती करावयाच्या पदांचीयादी यासोबत जोडली आहे. सदर पदांपैकी ज्या संवर्गाची बिंदूनामावली मुख्य वनसंरक्षक (प्रा.) / वनसंरक्षक(प्रा.) किंवा त्यांचे अधिनस्त वनविभाग स्तरावर आहे त्या संवर्गाची भरती प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग शासननिर्णय दिनांक ४/५/२०२२ व दिनांक २१/११/२०२२ मधील सुचनांचे अनुषंगाने राबविणेकरीता खालीलप्रमाणे वेळापत्रक



४.गट-क मधील लिपीक-नि-टंकलेखक संवर्गाची भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतकरण्यात येणार असल्याने सदर पदाची भरती प्रक्रिया आपले स्तरावर राबविण्यात येवू नये. याबाबत यापूर्वीकळविल्याप्रमाणे मागणीपत्र तात्काळ या कार्यालयास सादर करावे.Maha forest Bharti

५.पूर्वी पेसा क्षेत्रात वनरक्षकांची १००% पदे ही स्थानिक अनुसूचित जमातीकरीता राखीव होती. मा.राज्यपाल यांचेकडील अधिसूचना दि. २९/८/२०१९ अन्वये पेसा क्षेत्रातील पदे अनुसूचित जमातींच्यालोकसंख्येनुसार १००%, ५०% व २५% याप्रमाणे राखीव करण्यात आली आहे. सदर अधिसूचना वनविभागात

कशाप्रकारे अंमलात आणावी याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. त्यामुळे पेसा क्षेत्रातील वनरक्षक

पदांबाबत वेगळ्याने सुचना निर्गमित करण्यात येतील. वनरक्षक भरती प्रक्रिया ही महसूल व वनविभाग शासन

निर्णय दिनांक २८/८/२०१८ अन्वये ठरवून दिलेल्या कार्यपध्दतीनुसार राबवावयाची आहे. त्यानुसार बिगर पेसाक्षेत्रातील वनरक्षक भरतीकरीता वरीलप्रमाणे कालबध्द कार्यक्रम राबवून प्रक्रिया पूर्ण करावी. 


Maha forest Bharti 2022 @mahitikatta


Post a Comment

0 Comments

Close Menu
Share on WhatsApp